महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा.
निलंगा/ प्रतिनीधी- महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व उपजिल्हा रुग्णालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने एक डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित विद्यार्थ्यांना शपथ देऊन व निलंगा शहरांमध्ये रॅली काढून समाज प्रबोधन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील सर व उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिनकर पाटील सर यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात केली.
यावेळी डॉक्टर जे डी माने मॅडम व प्राचार्य एस एस पाटील सर यांनी एड्स बद्दल विद्यार्थ्यांना समाजामध्ये जनजागृती कशी करावी याबद्दल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा सुनिल गरड सर यांनी केले व विद्यार्थ्याना शपथ डॉ चांद्रवदन पांचाळ सर यांनी दिली.
या रॅली साठी श्री पाटील साहेब व त्याचे सहकारी पोलिस स्टेशन निलंगा, उपजिल्हा रुग्णलयातील श्रीमती गुडमेवाड एस एस, श्री पठाण ए ए श्रीमती जाधव एस एन, श्रीमती लोंढे एस एस, श्रीमती एम एच कुंडके व श्री क्षीरसागर आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्रा.रवी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एडस् रेड रिबन हे चिन्ह सर्व विद्यार्थ्यांनी  खुप छान केले.
यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने