स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव धुरगुडे साहित्य सेवा पुरस्कार

 स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव धुरगुडे साहित्य सेवा पुरस्कार
उस्मानाबाद/प्रतिनिधी : मराठवाड्यातील साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांचा सन्मान व्हावा या हेतूने, तुळजापूर तालुक्यातील प्रसिद्ध 'स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव धुरगुडे 'यांच्या नावाने प्रमुख साहित्य प्रकारात मराठवाडा स्तरिय साहित्य पुरस्कार देण्यात येणार असल्याची  घोषणा नुकतेच करण्यात आली आहे.
त्यात कथा-कादंबरी,काव्यसंग्रह,विशेषांक व स्वातंत्र्य संग्राम/सैनिक कथा असे चार प्रकारात सन्मान दिले जातील.
त्यासाठी ज्यांचे पुस्तक दिनांक 1डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या काळात प्रकाशित झाले आहे. त्या लेखक/कवींनी आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती त्यासोबत आपला पासपोर्ट साईज फोटोसह स्वत:ची थोडक्यात माहिती पाठवावयाची आहे.
साहित्यकृतीसह ही माहिती आयोजकाकडे स्विकारण्याचा अंतिम  दि.15 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळ पर्यंत असेल. प्राप्त साहित्यातुन परिक्षकाद्वारे निवड होऊन गौरव पात्र साहित्य व साहित्यिक यांची यादी दि. 24 डिसेंबर 2023 रोजी वृत्तपत्रातून जाहीर करण्यात येईल. 
 प्रथम पुरस्कार :- 3000 रूपये
 द्वितीय पुरस्कार :-2000 रुपये
 तृतीय पुरस्कार  :- 1000 रूपये
सन्मान पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. 
नियम अटी हे पुरस्कार फक्त मराठवाड्यातील लेखक/कवी यांचेसाठी असतील. आयोजकांचा निर्णय अंतिम राहिल.संबंधितांनी आपली पुस्तके व माहिती श्री राजकुमार भानुदासराव धुरगुडे पाटील पुणे व श्री कमलाकर सावंत,द्वारा भानुदासराव धुरगुडे युवक व शेतकरी प्रशिक्षण केंद्र, केशव बालाजी मंदिर औसा जि.लातूर  पिन कोड- 413520 या पत्त्यावर पाठवावी. असे राजकुमार भानुदासराव धुरगुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अधिक माहितीसाठी 9404566610 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने