प्रा. डॉ. विनोद शिंपले बॅ .पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 प्रा. डॉ. विनोद शिंपले बॅ .पी.जी. पाटील आदर्श शिक्षक  पुरस्काराने सन्मानित 

लातूर : कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील वनस्पतीशात्राचे गाढे अभ्यासक तथा विद्यार्थीप्रिय प्रा. डॉ. विनोद भिमराव  शिंपले यांना  सन  २०२२ - २३ च्या कै. बॅ .पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षक - प्राध्यापक यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा  पुरस्कार  न्यू कॉलेजमधील वनस्पतीशात्राचे गाढे अभ्यासक   प्रा. डॉ. विनोद भिमराव  शिंपले यांना नुकताच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी त्यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल - श्रीफळ, मानचिन्ह व रोख पाच हजार रुपये असे या  पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार प्रा. डॉ. विनोद शिंपले यांनी पत्नी एड. ज्योती शिंपले यांच्यासह सपत्नीक स्वीकारला. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उप कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम. पाटील, ओजस विनोद शिंपले  यांसह  अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल प्रा. डॉ. विनोद शिंपले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रा. डॉ. विनोद शिंपले हे लातूरचे ज्येष्ठ विधिज्ञ निवृत्तीराव करडे  यांचे जावई आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने