शिवाजी विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

शिवाजी विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा
रेणापूर - जातिभेद, वर्णव्यवस्थेमुळे पोखरलेल्या समाजाला, "महात्मा जोतिबा फुले" यांनी ज्ञानाचा मार्ग दाखवत परिवर्तनाची दिशा दिली. बहुजन समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले. स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य "महात्मा जोतिबा फुले" यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक  सूर्यकांत चव्हाण यांनी प्रतिमेचे पूजन केले , व उपस्थित  उपमुख्याध्यापक वसंत यादव,वेणुनाथ यादव,अंकुश शेळके, गौतम जाधव, विनोद जाधव, मल्लिकार्जुन ठोंबरे ,रमाकांत यशवंत, सुभाष सोनटक्के,पद्माकर लकडे, गंगाधर इरले, विनायक घार  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने