वीरशैव लिंगायत महामोर्चाचे शैलेश पाटील चाकूरकरांना निमंत्रण

 वीरशैव लिंगायत महामोर्चाचे शैलेश पाटील चाकूरकरांना निमंत्रण

लातूर ः वीरशैव लिंगायत समाजाचा गुरूवार दि.21 डिसेंबर 2023 रोजी गंजगोलाई ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाचे निमंत्रण काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकरांना देण्यात आले असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले
सरसकट लिंगायत समाजाला (लिंगायत, हिंदु लिंगायतांना) वाणी नावाला असलेले ओबीसीचे आरक्षण लागू करावे. महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळाची रचना करून 2000 कोटीचा निधी देण्यात यावा. चन्नबसवेश्‍वरांचे वास्तव्य लाभलेल्या निलंगा तालुक्यातील देवी हल्लाळी गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. तसेच मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्‍वरांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे व वीरशैव लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका पातळीवर वस्तीगृह सुरू करावे आदि मागण्यांसाठी लिंगायत महासंघाच्यावतीने वीरशैव लिंगायत महासंघाचा महामोर्चा गुरूवार दि.21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा.गंजगोलाईपासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. या महामोर्चासाठी सर्व धर्मगुरू, शिवाचार्य, किर्तनकार, प्रवचनकार मंडळी, राजकीय नेते, सामाजिक नेते यांना अमंत्रीत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज देवघर लातूर येथे शैलेश पाटील चाकूरकरांना प्रत्यक्ष भेटून वीरशैव लिंगायत समाजाच्या महामोर्चात येण्याचे निमंत्रण वीरशैव लिंगायत महामोर्चा संयोजन समितीच्यावतीने देण्यात आले. व शैलेश पाटील चाकूरकरांनी महामोर्चात सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले. हे निमंत्रण महामोर्चाचे नेतृत्व करणारे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार, मुख्य मार्गदर्शक शि.भ.प.नावंदे गुरूजी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शि.भ.प.लाळीकर महाराज, शि.भ.प.बालाजी महाराज येरोळकर, जी.जी.ब्रम्हवाले, एल.बी.आवाळे, प्रा.हासबे, कमलाकर डोके, माणिक कोकणे, राम बिरादार आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने