जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वितरण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वितरण
औसा: औसा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच सत्यवान जाधव ,आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास भोसले तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यप्रकाश भोसले हे उपस्थित होते ..
यावेळी मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक रवि कुरील यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले यानंतर रवी कुरील यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवि कुरील यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सत्यप्रकाश भोसले रवी कुरील श्रीमती रंजना हादवे सह विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने