प्रजासत्ताक दिनानिमित्त कविसंमेलनाचे आयोजन'
लातूर प्रतिनिधी- शब्दांकित प्रतिष्ठान अंतर्गत जाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था, लातूर व शब्दांकित साहित्य मंच, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:१५ वाजता
कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन' होत्या. प्रमुख उपस्थिती सौ. छाया सोनवणे तर संयोजक जाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव प्रा. डॉ.सविता किर्ते या होत्या. डॉ. सविता किर्ते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. नयन राजमाने यांनी शब्दांकित साहित्य मंचची भुमिका मांडली.
या कविसंमेलनात लातूर शहरातील अनेक नामांकित कवयित्रींनी सहभाग नोंदविला. निमंत्रित कवयित्री मध्ये विजयाताई भणगे, मंगला सास्तुरकर,
विमल मुदाळे,उषा भोसले,तहेसीन सय्यद,
डॉ.स्वाती जोशी,सौ.सविता धर्माधिकारी, सुलक्षणा सोनवणे-सरवदे, शोभा माने, ऋचा पत्की, निलीमा देशमुख, शिला कुलकर्णी,
सौ.सुनीता मोरे,सौ.वृषाली पाटील,सुलोचना मुळे, जना घुले,सत्यशीला कलशेट्टी,
डाॅ.सुषमा गोमारे, डाॅ.सुरेखा बनकर, सौ. छाया सोनवणे,
सत्यशिला कदम, व मनीषा शिंदे- गुंजरगे यांचा समावेश होता. तसेच आई ही ह्रदयस्पर्शी कविता सादर केली. व डाॅ.प्रा.नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन यांनी अध्यक्षिय समारोप केला. आई बद्दलच्या भावना व्यक्त करताना त्या आपल्या 'मोठं' या कवितेत म्हणतात...तिचे उरलेले चार घास
तिच्याही नकळत खाता आले नाही मला तिच्यासाठी काळजीचा सूर
व्यक्त करण्या इतकं मोठं
होताही आलं नाही मला...
सहजीवन जगत असताना स्त्रीला आपल्या पती विषयी कोणत्या भावना असतात या त्या व्यक्त करताना म्हणतात...
नको सातबारा नको बॅक बॅलन्स
तुझे ह्रदय मी रे जरा मागते मी
मला तारणारा श्वास असे तुझा ही
तुझा गंध दरवळे माझ्याच देही...
अशा दर्जेदार कवितांनी कवी संमेलन रंगले होते.
बहारदार सुत्रसंचलन सौ.सुरेखा बनकर यांनी केले तर आभार सौ. मंगल उबाळे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा