जि. प. प्रशालेत मराठी राजभाषा दिवस विविध उपक्रमांनी साजरा
औसा/प्रतिनिधी-तालुक्यातील भादा जि.प.प्रशालेत मराठी राजभाषा दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रथम शि. वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कणा कवितेने करण्यात आली 1वर्गातील मुलांनी "हि माय मराठी माझी "या गीतावर नृत्य केलं. प्रतीक काळे याने कविता गायन केले, सुलेमान शेख,रुद्र दूधभाते, सायली माळी यांनी भाषण केले, जुई क्षीरसागर जिजाऊ च्या वेशभूषा घेतली, प्राप्ती ने सावित्रीबाई च्च्या वेषभुषेत उपस्थित होती, अभिजीत गवळी, आर्यन लटूरे, रुद्र, यांनी नृत्य सादर केले. मु. अ. तथा मराठी विभाग प्रमुख श्रीमती. गुरव डी. व्ही. यांनी प्रास्ताविक केले अध्यक्षा श्रीमती नाईक, एस. जि यांनी भूषविले. श्रीमती नळे मॅम यांनी मराठी दिनाचे महत्व सांगितले, व स्वरचित्त कविता सादर केली. सूत्रसंचालन श्री.डॉ. नागेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणे साठी श्रीमती, शेंडे ए. बी. झरकर बी.ऐस.पवार जे. एन. भिंगोले. पी. बनसोडे जे. पी. तोटे सर यांनी प्रयत्न केले. तर सागरे एस. बी. यांनी आभार मानले श्री माळी सर यांनी विशेष सहायता केली. विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा