हासेगावच्या फार्मसी कॉलेजला विशेष कार्यकारी अधिकारी दंडगव्हाळ देवेंद्र यांची सदिच्छा भेट

हासेगावच्या फार्मसी कॉलेजला विशेष कार्यकारी अधिकारी दंडगव्हाळ देवेंद्र यांची सदिच्छा भेट 
    औसा (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर चे विशेषकार्यकारी  अधिकारी दंडगव्हाळ देवेंद्र  यांनी   श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालय ला  सदिच्छा  भेट दिली. त्याच बरोबर मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात आला . दांडगव्हाळ साहेबांनी महाविद्यालयातील प्रयोगशाळा ,ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम व इतर सोयीसुविधांची पाहणी केली . विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले कि विद्यार्थानी अभ्यासक्रमाशी निगडित व्हिडीओ पाहावेत तसेच ICT टूल्स चा वापर करून अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांचा वापर करावा असे प्रतिपादन  कार्यकारी अधिकारी दंडगव्हाळ देवेंद्र यांनी केले. महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमाचा देखील त्यांनी आढावा घेतला व महाविद्यालयाच्या यशाच्या वाढत्या आलेखाबाबत मनापासून कौतुक केले. 
           या प्रसंगी   मान्यवरांसोबत  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे संस्थेचे कोषाध्यक्ष  शिवलिंग जेवळे, प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे(जेवळे)  संचालक  नंदकिशोर बावगे,प्राचार्य डॉ  श्रीनिवास बुमरेला ,डॉ नितीन लोणीकर , लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर सर्व  प्राचार्य  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने