प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे सावित्रीच्या लेकीचा पुरस्काराने सन्मानित

प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे  सावित्रीच्या लेकीचा पुरस्काराने सन्मानित
       औसा (प्रतिनिधी )श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज  फार्मसी हासेगाव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांचा आर एन मोठेगावकर विद्यालय लातूर यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  महिलांनी सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्य पाहून सन्मान सावित्रीच्या लेकीचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
        यावेळी  आरसीसी चे संचालक शिवराज मोठेगावकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अमोल सगर, दिशा प्रतिष्ठानचे संचालक अभिजीत देशमुख, राजश्री शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव मीना मोटेगावकर  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      त्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष  भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे  संचालक नंदकिशोर बावगे , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी  , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज   , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर  , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी यांनी प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे ( जेवळे) यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने