स्त्री कडून स्त्रीचा सन्मान व आदर करायला पाहिजे-सौ.मीनल मोटेगावकर

स्त्री कडून स्त्रीचा सन्मान व आदर करायला पाहिजे-सौ.मीनल मोटेगावकर
     लातूर/प्रतिनिधी- शिस्त,वेळेचे नियोजन सातत्य ,आत्मविश्वास, दूरदृष्टी, इच्छाशक्ती, सृजनशीलता,वर्तमान काळाचा विचार यासूत्राचा अवलंब प्रत्येकाच्या जीवनामध्ये तंतोतंत पालन केल्यानंतर यश हमखास मिळते असे प्रतिपादन रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस लातूरचे संचालिका सौ.मीनल शिवराज मोटेगावकर यांनी यावेळी सांगितले.श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,आणि लातूर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सौ.मीनल शिवराज मोटेगावकर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
  या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, सौ.माधुरी बावगे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला ,प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम,प्राचार्या डॉ. श्यामलीला जेवळे, प्राचार्य शुभम वैरागकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
   सौ.मीनल शिवराज मोटेगावकर पुढे बोलत असताना "मुलींनी शिक्षण घेत असताना आपल्या आई-वडिलांची शरमेने मान कधीच खाली होऊ देऊ नका प्रामाणिकपणे अभ्यास आणि अभ्यासच करा" असे सखोल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   "प्रत्येक पुरुषाच्या यशामागे आपल्या धर्मपत्नीच्या सिंहाचा वाटा असतो "असे प्रतिपादन सचिव वेताळेश्वर बावगे यांनी केले.तसेच नंदकिशोर बावगे मनोगत व्यक्त करताना"प्रत्येक मुलींच्या मनगटामध्ये बळ असायला पाहिजे कसलाही समोर पाषाण आला तरी फोडून काढू अशी धाडस मुलीमध्ये असायला पाहिजे असे "असे उद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.अक्षता लासुरे तर आभार प्रदर्शन नंदकिशोर बागवे यांनी केले या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद मुली मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने