औसा टि पॉईंट ते हनुमान मंदीर पर्यंत दोन्ही बाजु मोठी नाली साफ सफाई नाही केल्यास तीव्र आंदोलन करणार-माजी नगरसेवक गोविंद जाधव
औसा/प्रतिनिधी-शहरात दि. १३ व १४ एप्रिल २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला आहे व सध्या पडत आहे. ज्यामुळे औसा टि पॉईंट ते पंचायत समिती पर्यंतच्या नालीमध्ये अनेक ठिकाणी ब्लॉक होऊन पाणी व कचरा रोडवर मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. याबाबत आम्ही दि. २६/०७/२०२३ रोजी वरील दोन्ही बाजुची नाली काढण्याबाबत निवेदन दिलेले होते. परंतु आपण त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.आमच्या निवेदनाची दखल घेतली असती तर सदर पाणी ब्लॉक न होता सरळ नालीद्वारे निघाले असते.परंतू कालच्या पावसामुळे पुर्ण घाण ही मेन रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यावर येऊन नागरीकांना अडथळा झाला आहे.शहरातील मेन रोडवरील दोन्ही बाजुची नाली तसेच काझी गल्ली, मोमीन गल्ली, ढोर गल्ली, न्हावी गल्ली, माळी गल्ली, या भागातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याही त्वरीत काढुन घेण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.
असे निवेदन देण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा