महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतिने जागतिक वसुंधरा दिवस (अर्थ डे) मोठ्या उत्साहात साजरा
निलंगा/ प्रतिनिधी-शहरातील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीत वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.
पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे जंगलांची. अगदी शहरी भागातही भरपूर झाडे त्यानुसार सर्व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मार्गांनी जंगलतोड कमी करणे, अधिक झाडे लावणे, प्रदूषण घटवणे, योग्य जीवनशैली राखणे अशा मुद्यांवर सर्वांगीण जागृती व प्रसार करणे आवश्यक आहे.या करिता
राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुलींच्या वस्तीगृहात मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी कार्यक्रमाची दखल घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, प्रा. डॉ. चंद्रवदन पांचाळ,प्रा. डॉ. शरद उस्नाळे,प्रा. डॉ. माधव शेटकार, प्रा. डॉ. संतोष कुंभार,प्रा. नंदा भालके, प्रा. सुजित पवार, प्रा शिवराज हुनसनाळकर, प्रा. इर्शाद शेख ,प्रा. सुमित बूये आणि प्रा.सानुली पौळकर उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाधिकारी
प्रा.सुनील गरड व प्रा.परवेज शेख यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा