महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये
नोव्हेल फॉर्मुलेशन अॅप्रोचेस इन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
निलंगा : येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय "डिपार्टमेंट ऑफ फार्माशूटिक्स" व "डिपार्टमेंट ऑफ फार्मासुट्टिकल केमिस्ट्री" यांच्या संयुक्त विद्यमाने "नोव्हेल फॉर्मुलेशन अॅप्रोचेस इन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम" या विषयावर एक्सपर्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले.नोव्हेल फॉर्मुलेशन अॅप्रोचेस इन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम" या विषयावर एक्सपर्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले.त्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षक कर्मचा-यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी कौतुक केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डी. एस. टी. एस. मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी चे डॉ. श्रीशैल गुरगुरे, विभाग प्रमुख डॉ. माधव शेटकार. प्रा. डॉ शरद उसनाळे व कार्यक्रमाचे कोऑरडीनेटर डॉ.संतोष कुंभार प्रा. इर्शाद शेख, वरिष्ठ प्रा.सुनील गरड, डॉ.चंद्रभान पांचाळ उपस्थित होते."डिपार्टमेंट ऑफ फार्माशूटिक्स" व "डिपार्टमेंट ऑफ फार्मासुट्टिकल केमिस्ट्री, यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी या एक्सपर्ट लेक्चर चे आयोजन केले गेले.या कार्यशाळेमध्ये डॉ.श्रीशैल गुरगुरे सरांनी नॅनो पार्टिकल, नॅनो टेक्नॉलॉजी व नॅनो स्पॉनज म्हणजे काय याबद्दल सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. महाविध्यालयातील विद्यार्थी विध्यार्थीनींना याबद्दल अवगत केलं.
सूत्र संचालन प्रा. इर्शाद शेख यांनी मांडले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विनोद उसनाळे, प्रा. प्रीती माकने ,प्रा.शिवराज हुनसनाळकर, प्रा.माचीपल्ले, प्रा.सुरज वाकोडे प्रा.सुमित बूये, बालाजी वाल्मिकी,विशाल गिरी,पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा