आलमला येथे भव्य संगीत भजनी कार्यक्रमाचे आयोजन
आलमला- ता.औसा जि. लातूर येथे गुढीपाडव्यानिमित्त दिनांक 8.4.2024 रोजी सोमवारी रात्री 8 ते 11 या वेळेत भव्य संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मुंबई येथील संगीतातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका कु. ज्ञानेश्वरी गणेश गाडगे झी टीव्ही सारेगमप लिटल चॅम्पियन विजेती यांच्या भजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांना साथ संगत देण्यासाठी मृदंग भूषण श्री भरतआण्णा पठाडे, हार्मोनियम कु कार्तिकी गाडगे, तबला अलंकार श्री महादेवजी सगळे पाटील मुंबई यांची साथ लाभणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांना उपस्थित राहावे असे आव्हान या कार्यक्रम समितीचे आयोजक श्री कल्याण शिवराज आप्पा हुरदळे, कार्यवाहक श्री शिवाजी प्रभूआप्पा निलंगेकर, श्री रवी शंकरआप्पा कोरे, ग्रामस्थ मंडळ आणि भजनी मंडळ आलमला यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा