महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे पाच दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे पाच दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न
निलंगा/प्रतिनिधी-शहरातील महाराष्ट्र शिक्षण समिती, निलंगा अंतर्गत महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे आयक्यूएसी व एजे नेक्सटजेन फार्मसी इन्स्टिटयूट, जुन्नर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिकित्साविषयक संशोधन (Clinical Research) प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रमास अडथळा न करता सदरील अभ्यासक्रम हे ६,७,१३,१४, व २१ एप्रिल २०२४ या तारखेत टप्या टप्याने होणार आहे.महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर साहेब यांनी पाच दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम वर आधारित, चिकित्साविषयक संशोधन (Clinical Research) प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. पाटील होते. प्रास्ताविकेत त्यांनी मूल्यवर्धित अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे वर आधारित, चिकित्साविषयक संशोधन (Clinical Research) या विषयसंबंधी महतव आणि वर्तमान आणि भविष्य काळात  , औषधनिर्माण क्षेत्र सोबत चिकित्साविषयक संशोधन (Clinical Research) नौकरी मिळवण्याकरिता कसे उपयुक्त ठरू शकेल व या स्पर्धात्मक युगात आमचे विध्यार्थी नक्कीच त्याच करिअर घडवतील असे अपेक्षा व्यक्त केले.
या पाच दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम वर आधारित, चिकित्साविषयक संशोधन (Clinical Research) प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यासाठी एजे नेक्सटजेन फार्मसी इन्स्टिटयूट, जुन्नर, पुणे या संस्थेचे संचालक तथा शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी ओतूर येथील विभागप्रमुख डॉ. सुमित अशोक जोशी व त्यांचे सहकारी  प्रोफेसर सौ. वैशाली अमित आदरसे उपस्थित होते.या वेळी मंचावर IQAC कोऑर्डिनटर डॉ. शरद ऊसनाळे, NAAC कोऑर्डिनटर डॉ. सी. व्ही. पांचाळ, प्रा. सुनील गरड, एम. फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ. संतोष कुंभार व डॉ . एम. ए. शेटकार उपस्थित होते. या पाच दिवसीय मूल्यवर्धित अभ्यासक्रम प्रोग्रॅम कोऑर्डिनटर डॉ. सी. व्ही. पांचाळ व प्रा. इर्शाद शेख हे होते. डॉ. सी. व्ही. पांचाळ यांनी या अभ्यासक्रम संबंधी सखोल माहिती दिली व सदरील Add -On Course NAAC च्या नियमावलीनुसार घेतला जात असून विद्यार्थी व  महाविद्यालयास याचा गुणवत्ता सुधारणेसाठी फायदा कसा होतो हे नमूद केले. आपले महाविद्यालय असे Add-On Course विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करत असते याचा विद्यार्थ्यानी उपयोग करून घ्यावा हे सांगितले. प्रा. इर्शाद शेख सर यांनी हा अभ्यासक्रम पाच दिवसात कसा विभागलेला आहे आणि तो ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे घेण्यात येणार आहे व अभ्यासक्रम संपल्यानंतर प्रमाणपत्र मिळवण्याकरिता परीक्षा द्यावी लागणार आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र दिले जातील असे सांगितले. हा मूल्यवर्धित अभ्यासक्रम वर आधारित, चिकित्साविषयक संशोधन (Clinical Research) प्रमाणपत्र अभ्यासक्रम बी. फार्मसी तृतीय व बी. फार्मसी अंतिम वर्षच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. रविराज मोरे, प्रा. विनोद उसनाळे,  प्रा.सुरज वाकोडे,  प्र. नंदा भालके मॅडम, प्रा. शिवराज हुनसनाळकर, प्रा. सुजित पवार, प्रा. परवेज शेख, प्रा. सुशांत माचपल्ले, प्रा. सुमित बुये, सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सी. व्ही. पांचाळ तर आभार प्रदर्शन प्रा. एस. व्ही. गरड यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने