महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कामगार दिन लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात उत्साहात साजरा

महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कामगार दिन लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात उत्साहात साजरा
लातूर/प्रतिनिधी- "आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा ,आम्ही जपतो आमची संस्कृती"श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि लातूर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयत महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ. संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे प्रा.अतुल कदम,प्रा.शुभम वैरागकर ,डॉ. शारदा धाडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते .डॉ.संदीप क्षीरसागर मनोगत व्यक्त करताना 1 मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन करून गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची भाषेच्या आधारे विभागणी करण्यात आली. महाराष्ट्र निर्मितीसाठी खूप मोठा संघर्ष होता, त्यात अनेक हुतात्मा झाले. या लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे खूप मोठे योगदान आहे. तसेच कामगाराबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये  कामगारांच्या चांगल्या हिताचे तरतूद केली असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने