दयानंद कलाचे प्रा. डॉ. संदीपान जगदाळे करीत आहेत विद्यार्थ्यांसमवेत पोवड्यातून मतदार जनजागृती
लातूर/प्रतिनिधी- दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा. डॉ. संदीपान जगदाळे हे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना घेवून पोवाड्याच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी मतदार जनजागृती करीत आहेत. लातूर महानगरातील कमी मतदानाची टक्केवारी असलेल्या वार्डामध्ये व ग्रामीण भागात रॅलीत जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती प्रियंका अहिरे व श्रीमती रोहिणी नऱ्हे विरोळे यांच्या नियोजनाने तसेच लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, रेणापूर तहसीलदार श्रीमती भगत, स्वीप समन्वयक व शिक्षणाधिकारी श्री. कोपरे, नागेश मापारी, नोडल अधिकारी डॉ. दिलीप नागरगोजे आदि मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही विशेष जनजागृती मोहीम सुरू आहे.
राष्ट्रीय कर्तव्य व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून डॉ. संदीपान जगदाळे यांनी स्वतः पोवाड्याचे लेखन करून स्वरबध्द केला. त्यांनी लातूर येथील क्रीडा संकुल, मंठाळे नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, दयानंद सभागृह, मुरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आदि ठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पोवड्याचे सादरीकरण केले आहे. डॉ. जगदाळे यांच्याबरोबर नोडल अधिकारी डॉ. दिलीप नागरगोजे व रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी तथा पथनाट्य समन्वयक प्रा.विलास कोमटवाड यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या २५ विद्यार्थ्यांचा चमू पोवाडा व पथनाट्य सादरीकरणासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, कार्यालयीन अधीक्षक संजय तिवारी यांनी अभिनंदन केले आहे. पोवाडा सादरीकरणासाठी प्रा. विजय मस्के, स्वरांजली पांचाळ, सूरज साबळे, हरी कुंभार, आधिराज जगदाळे, अनंत खलुले, ज्ञानेश्वर जाधवर हे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. संकेत तेलंगे, अक्षय चौधरी,प्रणव माने, कु. पायल राठोड, कु.वृषाली पंडित, कु. स्नेहल जाधव, अभिजित पाटील या विद्यार्थ्यांनी पोवाडा गायनात सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा