एसव्हिएसएस फिजिओथेरपीची विद्यार्थिनींचा नाशिक विद्यापीठात पाचवी

एसव्हिएसएस फिजिओथेरपीची विद्यार्थिनींचा नाशिक विद्यापीठात पाचवी 
 लातूर/ प्रतिनिधी- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २६ व्या वार्षिक दिनानिमित्त २०२४ मध्ये नुकतीच जाहीर केलेल्या गुणवंत यादीत श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाची कु.
गौरी अशोकराव रोकडे या विद्यार्थिनीने हिवाळी परीक्षा २०२२ प्रथम वर्गात   ६९४ गुण मिळवून विद्यापीठात  पाचवा क्रमांक पटकावला आहे.या गुणवंत विद्यार्थिनीचे  कौतुक संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , संचालक नंदकिशोर बावगे,प्राचार्य डॉ विरेंद्र मेश्राम, डॉ.पल्लवी तायडे, डॉ.श्रद्धा नागमोडे, डॉ. पवन कुमार, डॉ.अर्निका राजपुरीया, डॉ.शारदा धडे, डॉ.अखिलेश बिवलकर, डॉ. प्रतिभा शेटकर, डॉ. गायत्री बतकुलवार यांनी केली.तसेच"आता पर्यंत एसव्ही एसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चा तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल या वर्षी शंभर टक्के लागला असून या पुढेही महाविद्यालय प्रत्येक वर्षी साठी शंभर टक्के निकाल देण्यासाठी कटिबद्ध राहील " असे प्रतिपदन प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम यांनी केले.तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, राजीव गांधी इन्स्टिट्यूट हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आयटीआय, लातूर कॉलेज ऑफ सायन्स ,ज्ञानसागर विद्यालय, गुरुनाथप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल ,एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर (जी.एन.एम ), एसव्हीएसएस कॉलेज ऑफ बी.सी.ए लातूर या सर्व युनिटच्या प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फिजिओथेरपीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने