रामनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मिळावा उत्साहपूर्ण संपन्न

 रामनाथ विद्यालयाच्या  माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मिळावा उत्साहपूर्ण संपन्न
आलमला:- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला येथील सन 1995  मधील दहावीत शिकत असलेल्या 120 विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन गेट-टुगेदर मेळावा दिनांक 12 मे 2024 रोजी रविवारी  विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सर्वप्रथम सकाळी दहा वाजता नियमित शाळेप्रमाणे सर्व मुलांची प्रार्थना झाली.तसेच परिपाठ संपन्न झाला विद्यालयातर्फे सर्वच माजी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व परिपाठानंतर सेवानिवृत्त शिक्षकांनी त्या मुलांचे काही वर्ग घेतले व काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.या स्नेहमीलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष  अँड उमाशंकर पाटील  प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव श्री प्रभाकर   कापसे विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका  सौ.अनिता पाटील , पर्यवेक्षक पी .सी.पाटील,  माजी मुख्याध्यापक  श्री मुळे एस.के., श्री लोणारे एस.बी, श्री बिराजदार एस. एस, सेवानिवृत्त सहशिक्षक श्री शेख ए .आय, श्री गायकवाड एम .व्ही, प्रा कदम ए. एस,सौ महामुनी एम. के .प्रा अभंगे ए. एम., सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक धाराशिवे एस. व्ही.हे उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन  व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे दिवंगत पदाधिकारी व कर्मचारी व त्या बॅचचे विद्यार्थी यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या तर्फे मंचावरील सर्वच मान्यवरांचा  व विद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा  शाल ,श्रीफळ  स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला..याप्रसंगी विद्यार्थी शिवदर्शन खिचडे यांनी प्रास्ताविक करत आपल्या मनोगतातून गेट-टुगेदर व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेण्या पाठीमागची भूमिका विशद केली  .त्यानंतर संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांनी  विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आपल्या बॅचची आठवण म्हणून विद्यार्थ्यानी संस्थेला साऊंड सिस्टिम भेट दिली. व या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थी , शिक्षक , सर्व मान्यवरांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.अशा पद्धतीने सकाळी10 ते  5 या  वेळेत विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवले.शेवटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड उमाशंकर पाटील यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर तीस वर्षांपूर्वीच्या शाळेविषयीच्या विद्यार्थ्यांनी आठवणी काढून जुन्या विश्वामध्ये एक दिवसाचा गेट-टुगेदर आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला या याप्रसंगी माझी मुख्याध्यापक ,शिक्षक, व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपण सध्या काय करतो आपले कुटुंबीय काय करतात याविषयी सर्वांनी एकमेकाचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  लक्ष्मीकांत खरटमोल यांनी केले तर  ऍड संगमेश्वर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.हा मेळावा संपन्न करण्यासाठी  माजी विद्यार्थी मनोज धाराशिवे,  पांडुरंग पाटील ,रविशंकर बिराजदार,आदम फाजल,अण्णासाहेब गायकवाड, शिवदर्शन खिचडे,संगमेश्वर पाटील , कपिल,धाराशिवे, कैलास निलंगेकर,बसवराज कापसे, उमाशंकर बिराजदार, रविकिरण खिचडे, सौ .वाडकर शिवकन्या, सौ संगमदेवी हुरदळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी अलमला, उंबडगा बु ,सत्तरधरवाडी, आलमला तांडा, कुलकर्णी तांडा, येलोरी ,औसा ,लातूर येथील तत्कालीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने