रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडवन्यासाठी पाठपुरावा करणार : संतोष सोमवंशी
लातूर: प्रतिनिधी-अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या व लातूर जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या अंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आणि रेशन दुकानदाराच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी दिले.
जिल्हाध्यक्ष सुधाकर दाजी पाटील व आर. आर. जोगदंड, औरंगाबाद विभाग सचिव इंद्रजीत यादगिरे, जिल्हा मीडिया प्रमुख तथा संघटक लातूर जिल्ह्यामधील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी रेखा कदम, आशा टोणगे, चतुराताई जाधव, मंगेश चव्हाण हाजी चाऊस, राहुल माने, महादेव कांबळे सचिन कांबळे व जिल्ह्यातील साडेचारशे दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करणे किंवा वेतनश्रेणी लागू करणे शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वजन करून हमाली बंद करणे अशा अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या धरणे आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी भेट देत मार्गदर्शन केले व पाठिंबा दिला. जिल्हा अध्यक्ष सुधाकर दाजी पाटील व दहा तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव व जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा