निबंध स्पर्धेत यशस्वी भादा प्रशालेतील विद्यार्थ्यांचा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते सन्मान

निबंध स्पर्धेत यशस्वी भादा प्रशालेतील विद्यार्थ्यांचा खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते सन्मान
  औसा/प्रतिनिधी-रोटरी क्लब लातूर मेट्रो आणि प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय लातूर  यांच्या वतीने 25ऑगस्ट हा जागतिक विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा  केला जातो.या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो आणि प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय लातूर  यांच्या  संयुक्त विद्यमाने विश्वबंधुत्व साठी माझे योगदान काय? या विषयावर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाभरातील 1200 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज  प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, राजभवन लातूर येथे संपन्न झाले.लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ.शिवाजी काळगे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी मॅडम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यांच्या शुभहस्ते हे बक्षीस वितरण करण्यात आले.भादा प्रशाला आणि भादा कन्या प्रशाला येथील निबंध स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह, भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जि.प.प्रशाला भादा(मुलांची )येथील 
चि. रितेश गणपत  माळी (प्रथम),
चि.तन्मय तुकाराम गवळी(द्वितीय),संस्कार  श्रीराम बनसोडे(तृतीय) तर जि.प.कन्या प्रशाला भादा  येथील 
कुं.ॠतुजा  परमेश्वर  कात्रे (प्रथम)
, जान्हवी उमाकांत  स्वामी(द्वितीय)
अंजली राजेंद्र  मगर(तृतीय) या निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लातूरच्या प्रमुख नंदाबबहनजी,रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचे अध्यक्ष कालिदास लांडगे ,सचिव विजय कोळी प्रोजेक्ट चेअरमन मनोज सुर्यवंशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने