" पायलीया बाजे रे मोरा "या भैरविने संगीत समारोहाची सांगता

" पायलीया बाजे रे मोरा "या भैरविने संगीत समारोहाची सांगता
औसा/  प्रतिनिधी-राग यमन मधील "कैसे गाऊ रे मना" , राग गौड मल्हार मधील "झुकी आई बदरिया सावन की" याबरोबरच तराणा आणि " भवानी दयानी, जगत जननी, पण घट जल परण कैसे मै जाऊ व " पायलिया बाजे रे मोरा" अश्या पं. शिवरूद्र स्वामी गुरुजींच्या भैरविने पं. भातखंडे संगीत समारोहाची रविवारी सांगता झाली.
        औसा येथील माऊली प्रतिष्ठान आणि माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने मुक्तेश्वर मंदिरात तीन दिवसीय पं. भातखंडे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
       या समारोहात अविनाश यादव, चैतन्य पांचाळ, प्रा. गोविंद पवार, डॉ. दत्ता राजे, पं. वेदांग धाराशिवे, पं. विठ्ठलराव जगताप, स्वानंदी सडोलिकर, प्रा. अभिजित अपस्तंभ, डॉ. वृषाली देशमुख, पं. व्यंकटेश आलकूड, पं. बाबुराव बोरगावकर, सरस्वती बोरगावकर आणि पं. शिव रूद्र स्वामी यांचे शास्त्रीय गायन, आयुष द्विवेदी यांचे ध्रुपद गायन, कू. बनानी दास यांचे संतूर वादन, पं. संगीत मिश्रा यांचे सारंगी वादन आणि श्वेता तंत्रे पाटील यांचे कथ्थक नृत्य सादरिकरण झाले.
        यावेळी तेजोवृष जोशी, आकाश बडगे, आमरीश शिलवंत, दीपक लिंगे, मनोज सोळंके, पं. राम बोरगावकर, जनार्दन गुडे, शशिकांत देशमुख आणि शंकरराव जगताप यांनी हार्मोनियम, तबला, पखवाज साथ संगत केली.
       या कार्यक्रमाचे उद्घाटन पं. शिव रूद्र स्वामी, व्यंकटराव राऊत राव, हणमंत लोकरे, अड. मुक्तेश्वर वागदरे, चंद्रकांत मरपल्लिकर, प्रा. बसवेश्वर गजभारकर, प्रा.युवराज हालकुडे, माधव पुरी, दिनेश भिसे, शिवाजी तोंडारे, ओमकार चव्हाण,खंडू क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने