संविधान मंच, नशा मुक्त भारत व हर घर तिरंगा कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आयोजित

संविधान मंच, नशा मुक्त भारत व हर घर तिरंगा कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आयोजितलातूर-महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित संविधान मंच, नशा मुक्त भारत व हर घर तिरंगा कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले.
                     कार्यक्रमाच्या अध्यक्ष मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या अधीक्षक मा. वाघमारे मॅडम, प्रमुख व्याख्याता नारी प्रबोधन मंचच्या सचिव, माजी प्राचार्य डॉ. कुसुम मोरे व नारी प्रबोधन मंचच्या सहसचिव प्रा. डाॅ. नयन भादुले- राजमाने या होत्या.
                      डॉ. कुसुम मोरे यांनी संविधानावर विस्तृत असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रा. डाॅ.नयन भादुले- राजमाने यांनी नारी प्रबोधन मंचाच्या कार्यावर प्रकाश टाकत महिला सक्षमीकरण, महिला जागृतीकरण, आज समाजात उत्पन्न समस्या व त्यावरील उपाय यावरती भाष्य करत उपस्थितांची मने जिंकली.
 मा. वाघमारे मॅडम यांनी अध्यक्ष समारोप केला. याप्रसंगी वसतिगृहाच्या मुली कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने