विद्यार्थी सहाय्यक मंडळास डॉ.नागोराव कुंभार यांची २५ हजारांची देणगी

 विद्यार्थी सहाय्यक मंडळास डॉ.नागोराव कुंभार यांची २५ हजारांची देणगी

लातूर- थोर विचारवंत,माजी प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी लातूरच्या विद्यार्थी सहाय्यक मंडळास २५ हजार रुपयांची देणगी देवून गरीब होतकरू विद्याथ्यार्र्ंच्या शिक्षणासाठी सहकार्य केले केल्याबद्दल त्यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
डॉ.नागोराव कुंभार यांनी त्रैमासिक विचारशलाकामधून लोकशाही,भारतीय संविधान,मानवी मूल्य जोपासण्याचे काम केले,तसेच शिक्षण क्षेत्रातही अनमोल कार्य केल्याची दखल घेवून सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्यावतीने समाजभूषण पुरस्कार देवून खा.शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच सन्मानीत करण्यात आले होते.या सन्मानाबद्दल विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.नागोराव कुंभार यांनी विद्यार्थी सहाय्यक मंडळास २५ हजार रुपयांची देणगी दिली.
या प्रसंगी मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ.नागनाथ मोटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कुसुमताई मोरे, कोषाध्यक्ष प्रा.बालाजी पळसकर, सहसचिव विक्रम कदम, संचालक प्रा.फ.म.शहाजिंदे, ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे,प्रा.सुधीर साळुंके आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने