चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते विलास सहकारी साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन

 चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते विलास सहकारी साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन


लातूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील वैशालीनगर  निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या
हंगाम २०२४-२५ च्या गळीत हंगाम रोलरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती
वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि़ १६ ऑगस्ट रोजी करण्यात
आले़.
यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, रेणा सहकारी
साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंत देशमुख, डॉ. सारीका देशमुख,
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे
कार्यकारी संचालक पंडित देसाई, रेणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी
संचालक भिमराव मोरे, श्री. संत शिमोमणी मारुती महाराज सहकारी साखर
कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, जागृती शुगर अँड
अलार्इंड इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर गणेश येवले यांची प्रमुख उपस्थिती
होती.
विलास सहकारी साखर कारखान्याने स्थापनेपासून आजपर्यंत सर्वच गळीत हंगाम
यशस्वतीपणे पार पाडले आहेत़. आगामी गळीत हंगामाची तयारी सुरु करण्यात आली
आहे़. शुक्रवारी कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख
यांच्या हस्ते रोलर पुजन झाले़. या कार्यक्रमास कार्यक्रमास कारखान्याचे
व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, संचालक बंकट भिसे, गोविंद बोराडे, अनंत
बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, अमर मोरे, रजीत
पाटील, गोविंद डुरे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभास माने, भारत आदमाने,
संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडिले, कार्यकारी संचालक संजीव देसाई
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने