मुरुड येथील १० कोटी ७८ लक्ष रुपये खर्चाच्या विकास कामाचा आ. कराड यांच्या हस्ते शुभारंभ

 मुरुड येथील १० कोटी ७८ लक्ष रुपये खर्चाच्या

विकास कामाचा आ. कराड यांच्या हस्ते शुभारंभ

विरोध करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेऊ नये – आ. रमेशअप्‍पा कराड

 

            लातूर दि.१६- केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या विविध विभागाच्‍या माध्यमातून लातूर तालुक्‍यातील मौजे मुरुड येथील १० कोटी ७८ लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते शुक्रवारी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. महायुती शासनाने मंजूर केलेल्या निधीचे आणि लाडकी बहीण यासह विविध योजनांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न निष्क्रिय काँग्रेसच्या आमदारानी करू नये असा इशारा या कार्यक्रमात बोलताना आ. कराड यांनी दिला. या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण मुरुड शहर ढवळून निघाले या विकास कामामुळे ग्रामस्थांतून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

          मुरुड ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यापासून भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून मुरुड शहराच्या विकासाला गती मिळाली. मुरुड ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घर तेथे झाड या वृक्षारोपण योजनेचा शुभारंभ, २ कोटी ९५ लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण आणि ३ कोटी ९८ लक्ष रुपये खर्चाच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि ६२ सिंचन विहिरी व १७५ गायगोठा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप असे एकुण १० कोटी ७८ लक्ष रुपये खर्चाच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुरुड शहरातील सर्वच जिल्हा परिषद शाळेला टीव्ही स्क्रीन व संगणक संचाचे वितरण शुक्रवारी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी मुरुडच्या सरपंच अमृताताई अमर नाडेउपसरपंच हनुमंतबापू नागटिळकसंगायो समितीचे अध्यक्ष वैभव सापसोडजीपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरीसां. बा. विभागाचे उपअभियंता तांबोळीभाजपा पंचायत राज व ग्रामविकास सेलच्या प्रदेश सहसंयोजक डॉ. सरोजनी राऊतभाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसेओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोटसंभाजी वायाळसुरज शिंदेभैरवनाथ पिसाळप्रताप पाटीललताताई भोसलेश्रुती सवयीमहेश कणसेअनंत कणसे यांच्यासह अनेकांचे प्रमुख उपस्थिती होती. मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालयजल जीवन मिशन अंतर्गत असलेली पाणीपुरवठा योजनाबस स्थानक येथील कामाची पाहणी करून आ. कराड यांनी समाधान व्यक्त केले.

          आमदार स्थानिक निधीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेतून श्रीज्ञानेश्वर मंदिर सभामंडपअंतर्गत सिमेंट रस्तेसिमेंट नाली बांधकामओपन जिमपेव्हर ब्लॉक रस्ताअंगणवाडी बांधकामजि प शाळेत सोलारशिवरस्तासमाज मंदिर दुरुस्ती आदी कामाचे लोकार्पण त्याचबरोबर दत्त मंदिर सभागृहकोकणदेवी सभागृहनरसिंह मंदिर सभागृहविविध पेवर ब्लॉक रस्तेशिव रस्तासमशान भूमी रस्तागावांतर्गत सिमेंट रस्तेनाली बांधकामवैदू हनुमान मंदिर सभागृहभुसार बाजार पत्रा शेड उभारणी यासह विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सिंचन विहिरी मंजूर झालेल्या ६५ शेतकऱ्यांना प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे २ कोटी ४८ लक्ष आणि जनावराचा गोठा मंजूर झालेल्या १७५ शेतकऱ्यांना ७७ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ३७ लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले. मुरुड शहरात ठीक ठिकाणी झालेल्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यास सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात त्या त्या भागातील नागरिकांनी आ. कराड यांचे वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले. एकूणच होत असलेल्या विविध विकास कामाच्या शुभारंभ निमित्ताने संपूर्ण मुरुड शहर ढवळून निघाले. मुख्य जाहीर कार्यक्रम छत्रपती शिवाजी चौकात झाला याप्रसंगी सर्व स्तरातील नागरिकांची मोठी गर्दी होती. लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात पैसे जमा झाल्याने आ. कराड यांना अनेक महिलांनी राखी बांधून महायुती शासनाचे आभार व्यक्त केले.

             मुरुडला पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केली. त्याचबरोबर वेळोवेळी पाठपुरावा करून मुरुडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी २५ कोटीचा निधी मंजूर करून घेतला असून लवकरच रुग्णालयाची सर्व सोयीयुक्त इमारत उभारली जाईल. खऱ्या अर्थाने मुरुडच्या सर्वांगीण विकासाला महायुती शासनाने गती दिली असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले कीमहायुती शासनाने गोरगरीब सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरू केल्या. महिला भगिनी आत्मनिर्भर हव्यात यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जाहीर केली असता या योजनेला काँग्रेसवाल्यांनी विरोध केला. महिलांना लाभ मिळू नये यासाठी न्यायालयात गेले. मात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे कळताच महिलांना मेसेज टाकून या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न नोटाच्या विरोधात निवडून आलेल्या निष्क्रिय काँग्रेस आमदाराकडून केला जात आहे. सरकार कोणाचे आहे योजना कोणाची आहे हे सर्वसामान्य जनतेला ज्ञात असून भावाने केलेल्या मदतीला बहीण कधीच विसरत नाही असे बोलून दाखविले.

         शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगून सत्तर वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने कधीच सर्वसामान्यांचा विचार केला नाहीकोणती योजना दिली नाही. मात्र केंद्र आणि राज्य शासनाने सर्व जाती धर्मांना न्याय देण्याची भूमिका घेऊन विविध योजनेचा लाभ दिला असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले कीगेल्या पाच वर्षात काँग्रेसचे निष्क्रिय आमदार कुठे होते असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक जवळ आली की जनता आठवते. आपल्या गावचापरिसराचाकुटुंबाचा विकास करण्यासाठी महायुती शासन पुन्हा सत्तेवर आले पाहिजे असे बोलून दाखविले.

         या जाहीर कार्यक्रमात हनुमंतबापूं नागटिळकडॉ. सरोजा राऊतवैभव सापसोडमहेश कणसे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून आ रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून मुरुड शहरात झालेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ हराळे यांनी केले. या कार्यक्रमास भैरवनाथ पिसाळसूर्यकांत नाडेमेघराज अंधारेअंजलीताई शिंदेफुलाबाई इटकरसुरज सूर्यवंशीपल्लवी घोडकेरवी माकोडे,अशोक सावंतबालासाहेब कदमलहू सव्वाशेबालाजी पठाडेसुरत सुरवसेतात्या ईटकरविशाल कणसेउषाताई शिंदे दिनेश अंधारेअभय सोनपेठकरपंकज गायकवाडराजाभाऊ नाडेनागराज बचाटेश्याम करपेगणेश स्वामीअनिल टेळेदत्ता गोरेशैलजा सगरसचिन घोडकेरेखा उबाळेयोगिता काटे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारीकार्यकर्तेगावातील महिलापुरुष सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने