रामनाथ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

 रामनाथ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
 आलमला :- श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात प्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन व संतश्रेष्ठ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील नववी, दहावीच्या मुलांतर्फे विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.. तसेच यावेळेस 'रामनाथ कर्मचारी आदर्श पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते त्यात विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री ईश्वर वाडकर यांचा त्यांच्या शाळेतील उत्तम कामगिरीमुळे  शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांनी सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोरंजनातून चारोळ्या निर्माण करून शिक्षकांची नावे ओळखण्याचा एक सुंदर खेळ घेतला,तसेच याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या काही क्रीडा स्पर्धा चेही नियोजन केले होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले शिक्षका विषयीचे मनोगत मांडले. यावेळी संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे हे आवर्जून उपस्थित होते व त्यांचाही सत्कार केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक पी. सी. पाटील  यांनी विद्यार्थ्यांना सर्वपल्ली राधाकृष्णन व संत श्रेष्ठ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विविध उदाहरणे देऊन माहिती सांगितली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. धाराशिवे गौरीशा कु. बिराजदार हर्षदा कु.गांधले हर्षदा सौ. उकरडे डी. आर.,श्री सूर्यवंशी भास्कर यांनी प्रयत्न केले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने