कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांतर्फे शिक्षक दिन हा अन्याय दिन म्हणून साजरा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांतर्फे  शिक्षक दिन हा अन्याय दिन म्हणून साजरा
औसा/प्रतिनिधी-5 सप्टेंबर संपुर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा होतो, परंतु महाराष्ट्रात हा दिवस महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांतर्फे अन्याय दिन म्हणून साजरा केला गेला.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तालुका तहसील कार्यालयात तहसीलदार मार्फत मा शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन आजचा दिवस हा अन्याय दिवस म्हणून पाळण्यात आला, या मागण्यांमध्ये, सरसकट जुनी पेन्शन योजना, वेतन स्तराचे प्रचलित धोरण, अंशतः अनुदानित महाविद्यालयांना टप्पा वाढ, वाढीव पदाचे समायोजन, सेवानिवृत्ती वय 60 करणे, रिक्त पद भरती, इ असून या संबंधी चे निवेदन हे औसा तहसीलदार यांना औसा तालुका जुक्टा च्या वतीने औसा तालुका जुक्टा अध्यक्ष प्रा शिवराज मिटकरी यांच्या वतीने देण्यात आले, त्याप्रसंगी उपस्थित संघटनेचे उपाध्यक्ष हलकुडे सर, सचिव बिरादार सर, जिल्हा प्रतिनिधी तनशेट्टे सर, कदम सर,घुले सर, पठाण सर, महावरकर सर, पवार सर, इंदलकर सर, साबदे सर, लहाने सर, गुट्टे सर,सुळकेकर सर, रवी जाधव सर, राजकुमार जाधव सर, झिंगाडे सर, स्वामी मॅडम,कुलकर्णी मॅडम, एन जी माळी सर, इ शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने