शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलासाठी मनसेचे सोलापूरच्या साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन

 शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलासाठी मनसेचे सोलापूरच्या साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन
 औसा/प्रतिनिधी-लातूर ग्रामीण विधानसभा व औसा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड धोत्री, दक्षिण सोलापूर या साखर कारखान्याने थकवलेल्या ऊस बिलासाठी मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे व लातूर मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना घेऊन सोलापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
  यावेळी साखर सहसंचालक कार्यालय आणि गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याकडून ७ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
 यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिडडे,सोलापूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,सोलापूर शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख,मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी,मनसे शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे,मनसे सोलापूर शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे,मोहोळ तालुका अध्यक्ष ॲड.कैलास खडके,जितूभाई टेंभूर्णिकर,प्रविण खडके,तानाजी गरड यांच्यासह शिवली,बिरवली,टाका,अंदोरा, वरवडा,गूळखेडावाडी,सतधरवाडी, आलमला,याकतपुर,नागरसोगा, कोरंगळा,भादा,जायफळ येथील अनेक शेतकरी बांधव,पदाधिकारी व कार्यकर्ते आदी. उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने