राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण प्रतिबंध करण्यासाठी एडल्ट बीसीजी लसीकरण करून घ्यावे- डॉ.सुनिता पाटील

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण प्रतिबंध करण्यासाठी एडल्ट बीसीजी लसीकरण करून घ्यावे- डॉ.सुनिता पाटील 
औसा-शासनाच्यावतिने 
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक औसा तालुक्यामध्ये 2653 जणांचे लसीकरण राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रतिबंध करण्यासाठी एडल्ट बीसीजी लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याची निवड झाली आहे. त्या अनुषंगाने औसा तालुक्यामध्ये मागील मार्च-एप्रिल 2024 दरम्यान सर्वे मध्ये पात्र लाभार्थी 40222 आढळून आले होते. त्यापैकी तालुक्यातील 2653 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहेत.पूर्वी टीबी उपचार घेतलेले म्हणजेच पाच वर्षांपूर्वीचे रुग्ण, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले तसेच धूम्रपान करणारे व्यक्ती व ज्या व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे यांची गाव पातळीवर आशा वर्कर यांच्या माध्यमातून सर्वे करून घेण्यात आला होता. अशांना 3 सप्टेंबर पासून गावातील आरोग्य उपकेंद्र ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्रात लसीकरण सत्र सुरू झाल्या. आशा स्वयंसेविकाशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. एस. देवणीकर सर व ग्रामीण रुग्णालय औसाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनिता पाटील मॅडम यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने