रामनाथ मध्ये प्राचार्या स्वाती कापसे यांचा सत्कार संपन्न
आलमला:- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता. औसा येथे दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी विद्यालयाच्या प्रांगणात "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा"टप्पा -2 या उपक्रमामध्ये ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल आलमल्याच्या प्राचार्या स्वाती प्रभाकर कापसे/ पारुडकर यांची शाळा औसा तालुक्यात प्रथम आल्यामुळे त्यांचा रामनाथ शिक्षण संस्थेमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ मा.व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता पाटील होत्या, प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्री पी. सी. पाटील प्रा. धनंजय बिक्कड,श्री रंगनाथ अंबुलगे,प्रा.मुळे पी. के.,प्रा.भारत चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्राचार्या स्वाती कापसे यांनी हे यश आपल्या सर्व टीमला सोबत घेऊन "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा"टप्पा -2 यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी संस्थेने व सर्वांनी सहकार्य केले, म्हणून आम्हाला हे तालुकास्तरीय बक्षीस मिळवता आले, याचा आनंद व्यक्त करताना या यशामध्ये सर्वांचाच सहभाग आहे. असे भाव उद्गार काढले त्यांच्या समवेत आलेल्या सौ. सुप्रिया जाधव मॅडम यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भास्कर सूर्यवंशी यांनी केले, तर आभार सौ. आमरजा उकरडे यांनी मांडले, यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रामनाथ मध्ये प्राचार्या स्वाती कापसे यांचा सत्कार संपन्न
www.swaranpushp.com
0
टिप्पणी पोस्ट करा