रामनाथ विद्यालयात केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

रामनाथ विद्यालयात केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
आलमला :- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे दि. 6 डिसेंबर 2025 रोजी "केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन"संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून आलमला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भागवत जगताप साहेब, अध्यक्ष म्हणून रामनाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे, तर प्रमुख अतिथी म्हणून औसा पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार  अशोक राठोड साहेब, तसेच आलमला गावचे सरपंच विकास वाघमारे व जि.प. कें. प्रा. शाळा आलमला येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवकुमार पाटील ब्लू बर्ड च्या प्राचार्य सौ.स्वाती कापसे,श्रीमती जयश्री खराबे मॅडम मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विज्ञान क्षेत्रातील "मिसाईल मॅन"म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा रामनाथ परिवारातर्फे सत्कार संपन्न करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनामध्ये शाश्वत शेती, हरितक्रांती, जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता या भागावर विद्यार्थ्यांनी अनेक प्रयोग मांडले होते. त्यात प्राथमिक विभागातून रामनाथ विद्यालयातील ' अपघात प्रतिबंधक यंत्र' प्रथम, जि.प. कें. प्रा. शा. आलमला येथील 'सोलार बस' द्वितीय,प्रा. शा. उंबडगा येथील ' आरोग्य आणि स्वच्छता हा प्रयोग तृतीय आला. दिव्यांग विभागातून प्रा. शा. येथील कचरा व्यवस्थापन हा प्रयोग प्रथम आला.
 तर माध्यमिक विभागातून रामनाथचा 'अपघात टाळण्यासाठी चुंबकाचा उपयोग' हा प्रयोग प्रथम आला तर ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल येथील ' 'लेझर सेक्युरिटी होम' हा प्रयोग द्वितीय आला. माध्यमिक मध्ये दिव्यांग विभागातून " स्वच्छ भारत" हा प्रयोग प्रथम आला. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 
आलमला केंद्रातील अनेक घटक शाळांनी सहभाग नोंदवला. विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून श्रीमती सुमित्रा दिवे मॅडम,श्रीमती वाडकर मॅडम व भास्कर सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य  पी.सी.पाटील यांनी केले. अध्यक्ष व उद्घाटक साहेबांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले व प्रत्येकाने आपल्या मनी वैज्ञानिक दृष्टी ठेवावी हे सांगितले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी रामनाथ मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने