महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे ‘फार्मा अन्वेषण २०२६’ अंतर्गत दोन उद्योग संस्थांसोबत सामंजस्य करार
लातूर-महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनानिमित्त ‘फार्मा अन्वेषण २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास व उद्योग क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने दिनांक ६ मार्च २०२६ रोजी मॅट्रिक्स कोडिंग सोल्युशन तसेच इंस्टा व्हिजन लॅबोरेटरी, सातारा यांच्यासोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला.महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.विजय पाटील निलंगेकर साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर पाटील, व नॅक कॉर्डिनेटर डॉ. चंद्रावधन पांचाळ, आय. क्यू. ए.सी. कॉर्डिनेटर डॉ. शरद उसनाळे तसेच ट्रैनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. सुनील गरड यांची प्रमुख उपस्तीथी होती.
या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना वैद्यकीय कोडिंग व आरोग्य सेवा उद्योग संदर्भात प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सेमिनारमध्ये वैद्यकीय कोडिंगचे महत्त्व, आरोग्य क्षेत्रातील विविध करिअर संधी तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच या सहकार्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी करिअर जनजागृती सेमिनार, वैद्यकीय कोडिंग कार्यशाळा, कौशल्य विकास कार्यक्रम, इंटर्नशिप मार्गदर्शन व नोकरीसाठी सहाय्य यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सुनील गरड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने प्रा. सानुली पौळकर यांनी केली.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी विदयार्थीनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा