लक्ष्मीकांत सोमाणी यांची मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. छ. संभाजीनगरच्या संचालक पदावर निवड...
*नागरी सहकारी बँकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार .. लक्ष्मीकांत सोमाणी यांचा निर्धार.*
मराठवाड्यातील सर्व नागरी सहकारी सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणारी अपेक्स संस्था म्हणून कार्यरत असलेली मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. छ. संभाजीनगर या महत्वाच्या संस्थेची नुकतीच संचालक मंडळाची सार्वजनिक पंचवार्षिक निवडणूक पर पडली, यामध्ये लातूर जिल्ह्यातून जेष्ठ कर सल्लागार, लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेचे संचालक तथा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मोतीलालजी सोमाणी यांची संचालक पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
लक्ष्मीकांत मोतीलालजी सोमाणी यांनी मागील काळात कर, बँकिंग, सहकार व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, टॅक्स प्रोफेशनल असोसिएशन लातूरचे अध्यक्ष पद, टॅक्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र चे जनरल सेक्रेटरी पद भूषवले, मागील ३ दशकापासून लक्ष्मी पतसंस्था, श्रीकिशन सोमाणी विद्यालय व लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेत संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावरील बँकिंग परिषदेत बेस्ट स्पीकर म्हणून गौरवण्यात आले आहे, तसेच मागील वर्षी लातूर माहेश्वरी सभेने पुरस्काराने सन्मानित केले आहे.
नागरी सहकारी बँकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सतिष भोसले, संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले असून व विविध घटकांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा