महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या प्रभारी सभापतीपदी संतोष सोमवंशी
पुणे : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणेचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्याविरोधातील अविश्वास ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले आहे. या रिक्त झालेल्या पदाचा प्रभारी सभापती म्हणून संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अविश्वास ठरावावर चर्चा होऊन तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर सभापतीपदाची जबाबदारी उपसभापती संतोष सोमवंशी यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पदभार स्वीकारल्यानंतर सोमवंशी यांनी बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी व संबंधित घटकांच्या हितासाठी संघाचे कामकाज अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्यातील बाजार समित्यांच्या विविध प्रश्नांवर समन्वय साधून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संतोष सोमवंशी यांची प्रभारी सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल बाजार समिती क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक व सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा