किल्लारी/ औसा तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीनसह विविध पिके व फळबागा पाण्याअभावी वाळत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. आज औसा तालुक्यातील बोरफळ, उजनी, लामजना व पारधेवाडी येथे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी करून नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि व्यथा समजून घेतल्या.
पिकांचे झालेले नुकसान अत्यंत गंभीर असून, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक ती शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.
संकटाच्या या काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांना योग्य तो न्याय आणि शासनाची मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे ही खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती संतोष सोमवंशी, विनोद आर्य, उपसभापती शेखर चव्हाण , व्हाईस चेअरमन किशोर जाधव, सपोनि महावीर जाधव, तानाजी सुरवसे, सुधीर पाटील, रवी पाटील,तलाठी सत्यजित पाटील, व्यंकट बिराजदार,कृषी अधिकारी काळे, जगताप, सय्यद, वलिखा पठाण , मधुकर दंडगुले,परमेश्वर साखरे, तुकाराम बिराजदार, संताजी होळकर सह शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा