कृषी उत्पन्न बाजार समितीत मोफत नेत्र शिबिरास प्रचंड प्रतिसाद
600 हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी; 500 जणांना चष्म्यांचे वाटप, 125 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड
लातूर:- दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन आदिशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच शंकरशेठ साबळे हॉस्पिटल, सोलापूर यांच्या सहकार्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड लातूर येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास बाजार समितीतील विविध घटकांमधील गरजू,गरीब महिला व पुरुषां उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकरी , अडते, गुमास्ते , हमाल बांधव यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरज असलेल्या ५०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर १२५ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरशेठ साबळे हॉस्पिटल सोलापूर यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहेत.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. जगदीशजी बावणे, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, श्री. बालाप्रसादजी बिदादा, श्री. शिवाजी कांबळे, बाजार समितीचे इतर संचालक व सहसचिव श्री. सतीश भोसले यांच्यासह रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन आदिशक्तीच्या चेअरपर्सन रो. सुप्रिया दाडगे व सचिव रो. स्वाती बादाडे उपस्थित होते.
यावेळी क्लबच्या संगीता लातुरे, सारिका गांधी, प्रणिता उटगे, सरिता जोशी, स्वाती दावनकर, जयश्री बारपुते, अर्चना मद्रेवार, प्रिया हिंगणे, सारिका निलावार, तेजस्वी घवले, वर्षा इंदुरकर, माधुरी चिले, गायत्री शिंदे, अंजली सातपुते, लता पत्रावळे, प्रज्ञा स्वामी, प्रोजेक्ट चेअरमन छाया मोरलावार, गीता दानाई तसेच रोटरी सदस्य रो. रमेश चिल्ले, सुधीर लातुरे, रो. शिरीष उटगे, अजय दुडिले, अमोल दाडगे, श्रवण बियाणी, भालचंद्र दानाई, शशिकांत मोरलावार संतोष गांधी, अविनाश आळंदकर व रोटरॅक्ट क्लब चे तनिष्का बोरा, बिदादा, अक्षय मोरलावार आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सभापती श्री. जगदीशजी बावणे यांनी बाजार समितीच्या माध्यमातून गरजू घटकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास सहकार्य केले जाईल, असे सांगितले. तसेच रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन आदिशक्तीच्या सहकार्याने भविष्यातही बाजार समितीच्या माध्यमातून विविध आरोग्य तपासणी व समाजोपयोगी शिबिरे आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.
गरजू नागरिकांना मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गांधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन छाया मोरलावार यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा