विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग शुक्रवारी राहणार बंद
लातूर : महात्मा गांधी जयंजीनिमित शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६ रोजी शासकीय सुट्टी असल्याकारणाने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी) बंद राहील. तसेच शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६ रोजी पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील. रुग्णालयातील आपत्कालीन सेवा २४ तास सुरु राहील, असे लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा