अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू;शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू;शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

लातूर : सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (जीआयओ), शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क (फ्रिशीप), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑईलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी, १२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर सर्वप्रथम आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून 'महाआयडी' तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन आणि नूतनीकरण करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी यांसारखी सर्व माहिती अद्ययावत ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, निर्वाह भत्ता आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास (डोमिसाईल) दाखला व इतर शैक्षणिक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार ठेवून ऑनलाइन अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात तात्काळ जमा करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे ही प्रवेश प्रक्रियेचाच एक भाग असल्यामुळे, महाविद्यालयांनी प्रवेशाच्या वेळीच विद्यार्थ्यांकडून हे ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत आणि ते अर्ज विनाविलंब सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने