राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा कव्हेकर परिवाराच्यावतीने सन्मानपूर्वक सत्कार कैलास निवासस्थानी सदिच्छा भेट; महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
लातूर-महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. मेघनाताई दीपक साकोरे-बोर्डीकर या लातूर दौर्यावर आल्या असता, त्यांनी भाजपा नेते तथा किसान मोर्चाच्या गुजरात व गोवा राज्यांचे प्रभारी आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मजगे नगर येथील ‘कैलास निवासस्थानी’ सदिच्छा भेट दिली. यावेळी कव्हेकर परिवाराच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.या प्रसंगी लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेच्या संचालिका आदितीताई अजित पाटील कव्हेकर, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी प्राचार्या कुसुमताई मोरे, भाजपाच्या नगरसेविका रागिणीताई यादव, शोभाताई पाटील, श्वेताताई घोरपडे, साधनाताई पळसकर, सविताताई मोतीपवळे, प्रा.डॉ. क्रांती मोरे, साहित्यिक वृषाली पाटील, प्रा. अवस्थी मॅडम, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कोरे, राजाभाऊ मुळे, सागर घोडके आणि संतोष तिवारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा