राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार


लातूर-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ लातूर दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष तथा  माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी भाजपा नेते तथा किसान मोर्चाचे गुजरात व गोवा राज्यांचे प्रभारी आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मजगे नगर येथील ‘कैलास निवासस्थानी’ सदिच्छा भेट दिली. यावेळी कव्हेकर परिवाराच्यावतीने माजी खासदार सुनील तटकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील, लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा आमदार संजय बनसोडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गटाचे) लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्या आदितीताई अजित पाटील कव्हेकर, बाबासाहेब कोरे, बबन भोसले, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, राजाभाऊ मुळे, एमएनएस बँकेचे कार्यकारी संचालक नितीन सराफ, प्रशांत पाटील, धनंजय जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने