विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलचे तायक्वांदो विभागीय स्पर्धेत दुहेरी सुवर्ण यश

 विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलचे तायक्वांदो विभागीय स्पर्धेत दुहेरी सुवर्ण यश


लातूर : तायक्वांदोच्या विभागीय स्पर्धेत विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल, लातूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली. या उल्लेखनीय यशामुळे दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

U-70 किलो वजनी गटात श्री चोरमले याने प्रथम क्रमांक, तर U-65 किलो वजनी गटात उमर काझी याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

या दुहेरी सुवर्ण यशामुळे विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेचे विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, तायक्वांदोतील या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला आणखी बळ मिळाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य बसवेश्वर धाराशिवे, कॅम्पस डायरेक्टर किशोर जेवे, व्यवस्थापकीय संचालक ऋतिक धाराशिवे, प्राचार्य अमोल कुंभार, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर हादवे, मार्गदर्शक शिक्षिका कोमल वडसकर तसेच शिक्षक व पालकांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

संस्थेचे अध्यक्ष शिवचरणजी धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकरजी कापसे तसेच सहसचिव महादेवजी खिचडे यांनी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण क्रीडा कामगिरीचे कौतुक करत जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने