दसरा नवरात्री वसंत पंचमी विशेष महत्व:

दसरा नवरात्री वसंत पंचमी विशेष महत्व:  
 नवरात्र विशेष 
  दसरा नवरात्री विशेष वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजन महत्वाचे विद्यार्त्यांनी या दिवशी सरस्वती पूजन आवश्य करावे "ॐ नमो भगवती सरस्वती वागवादिनी मम् विद्या देही देही स्वाहा:" हा मंत्र दररोज 108वेळा म्हणावा. या पाचव्या माळेची अधिष्ठात्री देवी स्कंदमाता
मातृत्व, करुणा, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचे दिव्य प्रतीक आहे.
       भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची पूजा-अर्चा करण्याचा उत्सव नव्हे, तर स्त्रीशक्तीचा गौरव, आत्मशुद्धी, संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांची साधना करण्याचा पवित्र काळ होय. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आदिशक्तीच्या एका विशिष्ट स्वरूपाची उपासना केली जाते. नवदुर्गेची नऊ रूपे विविध आहेत 
• शैलपुत्री: हे देवीचे पहिले रूप आहे. पर्वतराजा हिमालय यांची कन्या असल्यामुळे यांना शैलपुत्री म्हणतात. यांचे वाहन नंदी (बैल) आहे. ब्रह्मचारिणी: हे दुसरे रूप तपश्चर्या, संयम आणि ज्ञान दर्शवते. यांच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू असतो. चंद्रघंटा: हे तिसरे रूप शांतता आणि साहसाचे प्रतीक आहे. यांच्या मस्तकावर अर्धचंद्र असून यांच्या गळ्यात घंटेचा आकार आहे. कुष्मांडा: हे चौथे रूप सृष्टीची उत्पत्ती करणारी आदिशक्ती मानली जाते. या अष्टभुजा असून सिंह त्यांचे वाहन आहे. स्कंदमाता: हे पाचवे रूप कार्तिकेयाची (स्कंद) माता म्हणून पूजले जाते. त्या मायेचे व वात्सल्याचे रूप आहेत. कात्यायनी: महर्षी कात्यायनांनी तपश्चर्या केल्यामुळे देवीचे हे रूप कात्यायनी म्हणून प्रसिद्ध झाले. ही एक योद्ध्या व न्याय देणारी देवी आहे. कालरात्री: हे सातवे रूप भयंकर आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारे आहे. यांचे रूप काळे व तीन डोळे असलेले असून वाहन गर्दभ (गाढव) आहे. महागौरी: हे आठवे रूप अत्यंत शांत, शुद्ध आणि पवित्र मानले जाते. त्या श्वेत वस्त्रात वृषभ (बैल) वर विराजमान असतात. सिद्धिदात्री: हे नववे आणि अंतिम स्वरूप सर्व प्रकारच्या सिद्धी व ज्ञान देणारे आहे. त्या कमळावर विराजमान असतात. 
          नवदुर्गेच्या पाचव्या स्वरूपाला ‘स्कंदमाता’ असे संबोधले जाते. पंचमीच्या दिवशी स्कंदमाता देवीची भक्तिभावाने पूजा केली जाते.
स्कंदमाता हे नाव भगवान स्कंद अर्थात कार्तिकेय यांच्या मातृत्वाशी संबंधित आहे. देवी पार्वतीचे हे स्वरूप मातृशक्तीचे, वात्सल्याचे, धैर्याचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. तिच्या उपासनेतून भक्ताला प्रेम, संयम, जबाबदारी आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना केली जाते.
देवी स्कंदमातेचे स्वरूप कसे आहे?
      पौराणिक परंपरेनुसार स्कंदमाता देवीचे स्वरूप अत्यंत मंगलमय, तेजस्वी आणि करुणामयी आहे. देवीच्या कुशीत बालस्वरूपातील भगवान कार्तिकेय विराजमान असतात. तिच्या हातांमध्ये कमळपुष्पे असून, काही हात भक्तांना अभय आणि आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत दाखवले जातात. देवी सिंहावर आरूढ असलेली किंवा कमळावर विराजमान असलेली दिसते.
देवीच्या हातातील कमळ पवित्रता, निर्मळता आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते. सिंह धैर्य, पराक्रम आणि निर्भयतेची आठवण करून देतो. बाल कार्तिकेय मातृत्व, संस्कार, संरक्षण आणि पुढील पिढीच्या संगोपनाचे प्रतीक आहेत.
या स्वरूपाचा आध्यात्मिक अर्थ अत्यंत व्यापक आहे. जीवनामध्ये सामर्थ्य असणे आवश्यक आहे;
नवदुर्गा उपासनेतील स्कंदमातेचे महत्त्व
नवदुर्गेची नऊ स्वरूपे मानवी जीवनातील विविध सद्गुणांचे आणि आध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक म्हणून पाहिली जातात. शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंतची ही उपासना भक्ताला श्रद्धा, तपश्चर्या, विवेक, धैर्य, करुणा आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व समजावून देते.
स्कंदमाता हे पाचवे स्वरूप असल्यामुळे नवरात्रीच्या पंचमीला तिच्या पूजेला विशेष स्थान आहे. भक्तिभावाने देवीचे स्मरण करून आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या अधिक सजगतेने पार पाडण्याचा संकल्प केला जातो.
स्कंदमातेची उपासना विशेषतः मातृत्वाचा सन्मान, मुलांचे कल्याण, कुटुंबातील प्रेम, शिक्षणातील प्रगती आणि मनःशांती यांसाठी प्रार्थना करण्याशी जोडली जाते. मात्र, उपासनेचा खरा हेतू केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवणे नसून स्वतःच्या विचारांमध्ये आणि वर्तनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे हा आहे.
स्कंदमाता देवीचा मंत्र
स्कंदमाता देवीच्या पूजेमध्ये पुढील मंत्राचा जप केला जातो.
॥ ॐ देवी स्कन्दमात्रे नमः ॥
हा मंत्र श्रद्धेने ११, २१ किंवा १०८ वेळा म्हणता येतो. मंत्रजप करताना मन शांत ठेवावे.
स्कंदमातेच्या ध्यानासाठी पारंपरिक स्तोत्रातील पुढील श्लोकही म्हटला जातो.
*सिंहासनगता नित्यं पद्माञ्चितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥......
या श्लोकातून सिंहावर विराजमान, कमळ धारण करणाऱ्या आणि भक्तांना शुभत्व देणाऱ्या स्कंदमाता देवीचे स्मरण केले जाते.
 नियमित जपामुळे काही व्यक्तींना शांतता आणि मानसिक स्थैर्य अनुभवता येऊ शकते.
कमळ किंवा इतर उपलब्ध स्वच्छ फुले अर्पण करता येतात. केळी किंवा अन्य सात्त्विक फळांचा नैवेद्य दाखवता येतो. पूजेनंतर देवीचा मंत्रजप, स्तोत्रपठण किंवा शांतपणे ध्यान करावे.भक्तिभाव, स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि मनातील सद्भावना यांना अधिक महत्त्व आहे.
हे धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेवर आधारित आहेत. त्यांना निश्चित फलप्राप्तीची हमी समजू नये.
स्कंदमाता आणि मातृशक्तीचा 
 स्त्रीशक्तीचा खरा गौरव आहे.
मंगल प्रार्थना करावी.
हे स्कंदमाता माते, आमच्या जीवनात प्रेम, शांती, सद्बुद्धी आणि धैर्य नांदू दे. प्रत्येक कुटुंबात सुसंवाद राहू दे. मुलांना शिक्षण आणि योग्य संस्कार मिळू देत. महिलांचा सन्मान वाढू दे. गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होऊ दे. सर्वांना योग्य मार्गाने प्रगती करण्याची प्रेरणा मिळू दे.
॥ जय माता दी! जय स्कंदमाता! ॥
लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सृष्टी मोरे पंडित
सृष्टी ऍस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर                      
“श्रद्धेला विवेकाची जोड, भक्तीला सेवाभावाची साथ आणि जीवनाला सकारात्मक विचारांची दिशा असावी !”
      भारतीय संस्कृतीमध्ये वसंत पंचमीला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवसापासून वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला जातो. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते, झाडांना नवी पालवी फुटते, फुलांचा सुगंध दरवळतो आणि वातावरण प्रसन्नतेने भरून जाते. त्यामुळे वसंत पंचमी हा निसर्गातील परिवर्तन, ज्ञानाची उपासना आणि नवीन सुरुवातींचा प्रतीकात्मक उत्सव मानला जातो. देवी सरस्वतीचे पूजन आणि ज्ञानाचे महत्त्व:असल्याने आपण विशेष करून  
• वसंत पंचमीचे महत्व पहणार आहोत. या दिवस प्रामुख्याने विद्येची, बुद्धीची, संगीताची, कलेची आणि वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती यांच्या पूजनासाठी प्रसिद्ध आहे. देवी सरस्वतीचे स्वरूप शुद्धता, विवेक, सर्जनशीलता आणि ज्ञानप्राप्तीचे प्रतीक मानले जाते. तिच्या हातातील वीणा संगीत व कलांचे, पुस्तक ज्ञानाचे, तर माळ साधना आणि एकाग्रतेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते.
या दिवशी विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कलाकार, संगीतकार आणि ज्ञानसाधना करणारे लोक देवी सरस्वतीचे पूजन करतात. मुलांच्या विद्यारंभासाठीही अनेक कुटुंबांमध्ये हा दिवस शुभ मानला जातो. पुस्तके, लेखणी आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करून ज्ञानाचा आदर व्यक्त केला जातो.
आला वसंत, बहरली सृष्टी,
फुलली फुले, खुलली दृष्टी।
पिवळ्या फुलांचा दरवळ गंध,
आनंदाने भरला सारा छंद।
शमी पूजनाची परंपरा या दिवशी विशेष आपट्याची किंवा शमीची पाने एकमेकांना 'सोने' म्हणून देण्याची आणि (लुटण्याची) परंपरा आहे. याद्वारे परस्परप्रेम व सद्भावना वाढीस लागते.शस्त्र आणि वाहन पूजन: या दिवशी सर्व शक्तीचा सन्मान म्हणून शस्त्रे, उपकरणे आणि वाहनांची पूजा केली जाते. शुभ कार्याची सुरुवात: याच साडेतीन मुहुर्पतांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन व्यवसाय, गृहप्रवेश किंवा कोणतेही शुभ कार्य सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते.*विजयादशमी म्हणजेच दसरा हा वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला अत्यंत महत्त्वाचा हिंदू सण आहे. हा सण आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो.
• प्रभू श्रीरामांची विजय कथा :-याच दिवशी भगवान श्रीरामाने दहा तोंडांच्या रावणाचा वध करून असत्याचा अंत केला होता. त्यामुळे रावणाचा पुतळा करून दहन करण्याचा विधी केला जातो. अशा विविध परंपरा धार्मिक कार्य उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात.
लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सृष्टी मोरे पंडित, कोल्हापूर 22 वर्षाचा अनुभव इंटरनॅशनल गोल्डन स्टार अवॉर्ड प्राप्त
सृष्टी ऍस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर 9637125119

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने