श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्नचा विद्यार्थी अर्सलान शेख याचे 'एनडीए' (NDA) परीक्षेत दैदिप्यमान यश!

 श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्नचा विद्यार्थी अर्सलान शेख याचे 'एनडीए' (NDA) परीक्षेत दैदिप्यमान यश!

लातूर :श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्नच्या यशाची परंपरा अखंडित ठेवत, महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी अर्सलान शेख याने नुकत्याच सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’ (NDA) च्या लेखी परीक्षेत (Written Exam) घवघवीत यश संपादन करून क्वालिफाय होण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या देदीप्यमान यशाबद्दल महाविद्यालयात त्याचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.एनडीए परीक्षेचे काठिण्य आणि निकालाचे प्रमाण (Success Ratio):संरक्षण दलात अधिकारी घडवणाऱ्या ‘युपीएससी’ (UPSC) तर्फे घेतल्या जाणाऱ्या एनडीए परीक्षेला देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानले जाते. या परीक्षेची आकडेवारी पाहता यशाचे प्रमाण किती आव्हानात्मक असते, हे स्पष्ट होते:परीक्षार्थींची संख्या: देशभरातून प्रत्येक सत्रात तब्बल 3.5 ते 4 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात व लेखी परीक्षेला बसतात.लेखी परीक्षा क्वालिफाईड होणारे: या प्रचंड स्पर्धेतून या वर्षी अवघे 7886 विद्यार्थीच लेखी परीक्षा (Written Exam) उत्तीर्ण करू शकले.क्वालिफाय होण्याचा रेशो (Success Ratio): लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा एकूण प्रमाण/रेशो हा केवळ 1% ते 1.25% इतका सूक्ष्म असतो."मागील पाच वर्षांपासून रिलायन्स लातूर पॅटर्नच्या माध्यमातून अत्यंत सुनियोजित व दर्जेदार पद्धतीने एनडीएची (NDA) परिपूर्ण तयारी करून घेतली जात आहे. भारतीय सैन्यदलात अधिकारी घडवण्याच्या या ध्येयात संस्थेने दरवर्षी सातत्याने एनडीएचा हमखास निकाल देण्याची एक गौरवशाली परंपरा निर्माण केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यशाची परंपरा कायम राखत अर्सलान शेख याने लेखी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून क्वालिफाय होण्याची किमया साधली आहे आणि संस्थेच्या यशाच्या परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे."

अर्सलान शेख याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय होनराव  सर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष म्हणाले की, "देशसेवेसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या एनडीए परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. योग्य नियोजन, दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांची अहोरात्र मेहनत यांमुळेच हे यश शक्य झाले असून अर्सलान पुढील एसएसबी (SSB) मुलाखतीतही उत्तम कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे."या सत्कार सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम मॅडम, कार्यकारी संचालक श्री. ओंकार होनराव  सर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना अर्सलानच्या चिकाटीचे व मेहनतीचे कौतुक केले तसेच त्याच्या पालकांचे आभार मानले. कार्यकारी संचालक ओंकार होनराव  सर यांनी विद्यार्थ्याला पुढील सर्व टप्प्यांसाठी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही महाविद्यालयातून असेच देशसेवक घडत राहतील असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. अर्सलान शेख याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने