संविधान दिनानिमित्त फुले -शाहू -आंबेडकर विचारमंचच्या वतीने 28 नोव्हेंबरला लातुरात व्याख्यान
लातूर (प्रतिनिधी): लातूर येथील फुले -शाहू -आंबेडकर विचार मंचच्या वतीने
संविधान दिनानिमित्त शनिवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता
भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात ' सामाजिक लोकशाही रुजल्याशिवाय राजकीय
लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही.' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन
करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक प्रा. सुधीर अनवले आणि राजकुमार
होळीकर यांनी दिली आहे.
'सामाजिक लोकशाही रूजल्याशिवाय राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही.' या
विषयावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते धनाजी गुरव, सांगली, डॉ.
हनुमंत सोनकांबळे, बसवंत अप्पा उबाळे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर देशमुख हे उपस्थित राहणार
आहेत. प्रास्ताविक व्यंकट कीर्तने हे करणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या
संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन संयोजक भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.
सुधीर अनवले, कामगार नेते राजकुमार होळीकर, व्यंकट कीर्तने, इंजि. शफी
शेख, प्रा. कल्याण कांबळे, अंकुश चव्हाण, संग्राम वाघमारे, गणपत पाटील,
अंकुश टकळगे, मारोती झाकणे, श्रीकांत मुद्दे, मोहन कांबळे, चंद्रपाल
गिरी, जी. जी. कांबळे, विनायक बोरीकर, साहेबअली सौदागर यांनी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा