नांदगावच्या दत्तनगरीत दत्त जयंती महोत्सवानिमित्त
श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन
लातूर : लातूर शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव येथील दत्तनगरीमध्ये श्री
दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण व श्रीमद भागवत
कथा ज्ञानयज्ञ, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती
दत्तनगरीचे संस्थापक गुरुवर्य गुलाब गिरी महाराज यांनी दिली. दि. १६
डिसेंबर ते दि. २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत हे धार्मिक उपक्रम पार पडणार
आहेत.
अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ९
श्री गुरुचरित्र पारायण, सकाळी ९ ते ११ दत्त याग, ११ ते १ गाथा भजन,
दुपारी १ ते २ प्रसाद, २ ते ५ श्रीमद भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ
आरती, रात्री ९ ते ११ हरिजागर असे विविध धार्मिक उपक्रम पार पडणार आहेत.
तसेच श्रीमद भागवताचा महिमा वेड व्यासाची कथा, परिक्षिती चरित्र
सृष्टीची रचना, ध्रुव चरित्र जडभरत कथा, आजामेळा उपरण्यान , प्रल्हाद
चरित्र गजेंद्र मोक्ष समुद्र मंथन , वामन अवतार कृष्णजन्म, गोकुळ उत्सव
आणि बाललीला गोवर्धन पूजा, रामलीला मथुरा गमन, कंस वध , रुक्मिणी
स्वयंवर, सूड, चरित्र, परिक्षिती मोक्ष आदी विषयावर कीर्तन - प्रवचन
होणारहेत. बुधवार, दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता श्रीदत्त
जन्मोत्सव साजरा होईल. भागवताचार्य हभप. वामन महाराज मुरंबीकर यांचे
काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी विजयकुमार पस्तापुरे , विश्वनाथ निगुडगे, बसवराज
निगुडगे, एड. कातळे , दिलीप चिद्रे , पन्नालाल कलंत्री, रामेश्वर हेड्डा,
धनंजय देशमुख,सत्तेश बलदवा, श्रीकांत ढमाले, प्रगती जोशी, विनोदकुमार
ब्रिजवासी, बसवराजप्पा वळसंगे, सोमनाथ स्वामी, राम स्वामी, डॉ. पांचाळ
यासह अनेक अन्नदाते प्रसादाची सोय करणार आहेत. या धार्मिक सोहळ्यास
भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्तनगरी
दत्त मंदिर देवस्थानचे संस्थापक गुरुवर्य गुलाब गिरी महाराज यांनी केले
आहे.
टिप्पणी पोस्ट करा