व्ही.डी.एफ. बाजार २०२६’मध्ये महिलांची मोठी उपस्थिती सौंदर्यविषयक मार्गदर्शनाला महिलांचा मोठा प्रतिसाद
इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर व पोशाख नाव्या स्टुडिओच्या वसुधा
लातूर : प्रतिनिधी
तेजोमय दिवाळीच्या सणानिमित्त स्थानिक महिला उद्योजिका, बचत गट आणि
लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध
करून देण्याच्या उद्देशाने आणि ‘एक पाऊल महिला सबलीकरणाकडे’ हा विचार
समोर ठेवून, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल
येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ या
संकल्पनेतून ‘व्ही.डी.एफ. बाजार २०२६’ या उपक्रमांतर्गत दि. ३१ आॅक्टोबर
रोजी सायंकाळी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर व पोशाख नाव्या
स्टुडिओच्या वसुधा शिंदे यांचे मार्गदर्शन झाले. या सौंदर्यविषयक
मार्गदर्शनात महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी गोल्ड क्रेस्टहाय लातूरच्या प्राचार्या हिना सिंग, लातूर
जिल्हा परिषदेच्या सदस्या सोनाली थोरमोटे, संगीता मोळवणे, लातूर
महानगरपालिकेच्या सदस्या श्रावणी झिपरे, प्रज्ञा उटगे, प्रितम जाधव,
योगिता जाधव, शीलाताई वाघमारे, पल्लवी सूर्यवंशी, मंदाकिनी पेठे, रोहिणी
शिंदे, तनूजा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर यांनी आपल्या सौंदर्यविषयक
मार्गदर्शनात महिलांनी मेकअप करीत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या
पाहिजेत. इव्हेंटनूसार मेकअप कसा करता येईल, याकडे बारकाईने लक्ष दिले
पाहिजे. जास्त भडक आणि बटबटीत मेकअप टाळावा, असे सांगीतले. पोशाख नाव्या
स्टुडिओच्या वसुधा शिंदे यांनी पाच महिलांना पोशाख परिधान करुन पोशाख कसा
असावा, याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले.
या उपक्रमात गृहउपयोगी वस्तू, हस्तकला, खाद्यपदार्थ, कपडे, दिवाळी साहित्य आणि दिवाळी फराळ व सजावटीच्या विविध वस्तूं स्टॉलस् आहेत. सदरील सर्व स्टॉल्स नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना स्थानिक उत्पादनांचा पर्याय उपलब्ध करून देतानाच,महिला उद्योजिका आणि बचत गटांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सुवर्णसंधी या बाजारातून आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात
आली आहे.
मानाच्या पैठणीच्या प्रथम विजेत्या ठरल्या पूजा चापोले
उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या पैठणीचा खेळमध्ये १०६ महिलांनी सहभाग
नोंदवत स्वत:मधील गुण कौशल्य सादर केले. मानाच्या पैठणीच्या प्रथम
विजेत्या ठरल्या पूजा चापोले, द्वितीय नूतन क्षीरसागर, तृतीय अर्चना
बंडगर उत्तेजनार्थ कविता गाडे, लता पाटील.
आज ‘रंगुया कविते’त कार्यक्रम विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ या संकल्पनेतून ‘व्ही.डी.एफ. बाजार २०२६’ या उपक्रमांतर्गत आज दि. १ नोव्हेंबर रोजी कवयत्री गुंजन पाटील याचा ‘रंगुया कविते’त हा कार्यक्रम होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा