व्ही एस पँथर्स च्या पदाधिकाऱ्यांनी चाकुर येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल साठी केला आत्मदहनाचा प्रयत्न

व्ही एस पँथर्स च्या पदाधिकाऱ्यांनी चाकुर येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल साठी केला आत्मदहनाचा प्रयत्न
लातूर: व्ही एस पँथर्स युवा संघटनेचे सं अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष शरद किणीकर यांच्या नेतृत्वाखाली चाकुर येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल साठी आत्मदहनाचा प्रयत्न व्ही एस पँथर्स च्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना आत्मदहानापासून रोखून ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात घेऊन जाऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
चाकुर येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल चे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून फक्त वीस टक्के काम शासनाच्या उदासीन धोरणामुळे हॉस्पीटल चे काम बंद पडले आहे यामुळे चाकुर तालुक्यातील जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन हेलपाटे घालावे लागत आहे, 
 हे काम तात्काळ चालू करून लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी खुले करावे अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष शरद किनीकर आणि तालुकाध्यक्ष अजय वाघमारे यांनी दिला
या आत्मदहन आंदोलनामध्ये चाकुर येथील असंख्य नागरिकांसह जिल्हाध्यक्ष शरद किनीकर तालुकाध्यक्ष अजय वाघमारे,ग्रुप तालुकाध्यक्ष समाधान गायकवाड, शहराध्यक्ष विक्रम कांबळे, कामगार आघाडी जिल्हा संघटक गोविंद कांबळे,तालुका सचिव गजानन कांबळे, वाहतूक आघाडी लातूर शहराध्यक्ष शाहरुख मणियार चाकुर तालुका उपाध्यक्ष महादेव गायकवाड,केतन कांबळे तालुका सदस्य समीर शेख दयानंद आठवले यांनी सहभाग नोंदवला.
हे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे अशी अपेक्षा नागरिकाकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने