दुष्काळाच्या सावटात बळीराजाची दीपावली आशेचा दीप उजळवणारी...!
संपत्तीचे रक्षण, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी कुबेर-लक्ष्मीची आराधना; यंदा मात्र बळीराजाने साधेपणाने, श्रद्धेने आणि आशावादाने साजरी करावी दीपावली!
भारतीय संस्कृतीत दीपावली हा सण केवळ दिव्यांचा आणि आनंदाचा उत्सव नसून सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा सण आहे. दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करून घरात सुख-समृद्धी नांदावी, आर्थिक स्थैर्य लाभावे आणि धनधान्याची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना केली जाते.
कुबेर-लक्ष्मी पूजन का करावे? त्याचे महत्त्व काय?
सनातन धार्मिक मान्यतेनुसार, माता लक्ष्मी ही संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवता आहे, तर भगवान कुबेर हे धनाचे रक्षक आणि भांडारपती मानले जातात. त्यामुळे धनाची प्राप्ती होण्याबरोबरच त्याचे योग्य रक्षण आणि विनियोग व्हावा, या भावनेतून कुबेर-लक्ष्मी पूजन केले जाते.
३. पूजन साहित्य आणि अर्पण : हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, नाणी तसेच हिशेबाच्या वह्यांची पूजा करावी.
४. मंत्रजप : पूजेदरम्यान खालील मंत्रांचा भक्तिभावाने जप करावा.
महालक्ष्मी मंत्र : ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। (१०८ वेळा)
कुबेर मंत्र : ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यादिपतये धनधान्यसमृद्धिं मे देहि दापाय स्वाहा॥ (१०८ वेळा)
५. आरती आणि प्रसाद : मंत्रजप झाल्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची आरती करावी. त्यानंतर शिरा, लाडू किंवा इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून उपस्थितांना प्रसाद वाटावा.
६. कमळाचे फूल : कमळ हे माता लक्ष्मीचे प्रिय आसन मानले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनात ताजे कमळाचे फूल अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे.
७. सोन्या-चांदीची नाणी : शक्य असल्यास लक्ष्मी आणि गणेशाचे चित्र असलेले सोन्याचे किंवा चांदीचे नाणे खरेदी करून त्याची पूजा करावी. ही नाणी ऐश्वर्य आणि धनसमृद्धीचे प्रतीक मानली जातात.
८. पितळी किंवा मातीचे दिवे : घरातील अंधकार दूर करून प्रकाशाचे स्वागत करण्यासाठी नवीन पणत्या किंवा धातूचा दिवा आणावा आणि तो प्रज्वलित करावा.
महालक्ष्मीची आरती
पूजेच्या सांगतेवेळी भक्तिभावाने महालक्ष्मीची आरती म्हणावी.
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ॥ धृ ॥
मातुलिंगगदाखेटकवरखेटकधारी।
मुकुटमणीशोभित लोचनत्रयधारी।
कनकरत्नांची केयूरे ल्याली।
प्रसन्नवदने भक्तां सुखदात्री झाली ॥ १ ॥
४. फटाके आणि अनावश्यक खर्चाला फाटा : यंदा फटाक्यांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च टाळूया. हा पैसा पुढील हंगामातील बियाणे, खते किंवा कुटुंबाच्या वैद्यकीय गरजांसाठी राखून ठेवूया. फटाक्यांच्या आवाजापेक्षा घरात तेवणारा एक छोटासा शांत दिवा मनाला अधिक आनंद आणि समाधान देऊ शकतो.
आशेचा दिवा तेवत ठेवूया!
दीपावली हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण आहे. संकटे कितीही मोठी असली तरी आशा, विश्वास आणि सकारात्मक विचारांची साथ सोडू नये. शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा एकदा सुखाचे दिवस यावेत, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि प्रत्येकाच्या घरात आनंद नांदावा, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना!
सर्व बळीराजा बांधवांना ही दीपावली सुखाची, समाधानाची आणि आशेची जावो!
"यंदा दिवा तेलाचा कमी आणि आशेचा जास्त लावूया... संकट कितीही मोठं असलं, तरी एकत्र मिळून त्यावर मात करूया!"
लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सौ. सृष्टी मोरे (पंडित)
सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर
ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मानसोपचार समुपदेशन आणि आध्यात्मिक ट्रेनर, अभ्यासक, लेखिका व मार्गदर्शक.
अनुभव : २२+ वर्षे
संपर्क : ९६३७१२५११९
टिप्पणी पोस्ट करा